जबलपूर-कोईमतूर गाडीला लेटमार्क

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रविवारी जबलपूर-कोईमतूर रेल्वे सहा तास उशिराने खाना झाली. वीकेंडलाच झालेल्या रखडपट्टीमुळे प्रवाशांचे हाल झाले. या गाडीसह अन्य तीन गाड्यांनाही लेटमार्क मिळाला आहे.

तिरुनवेली-एलटीटी उन्हाळी स्पेशल दोन तास २० मिनिटे उशिरा मार्गस्थ झाली. तिरुनवेली-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेससह एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस एक तास विलंबाने रवाना झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 22/Apr/2025