‘विकसित भारत २०४७’ आणि ‘शाश्वत मत्स्यव्यवसाय’ विषयावर स्पर्धा; १२ ऑक्टोबरपर्यंत निबंध सादर करण्याचे आवाहन
रत्नागिरी :
Ratnagiri Shirgaon College Essay Competition News अंतर्गत विद्यार्थी व युवकांमध्ये शाश्वत मत्स्यव्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेबाबत व्यापक जागरूकता निर्माण करण्यासाठी शहराजवळील शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनतर्फे ‘सेवासंकल्प’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या निबंध स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या पाल्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठीचे विषय आणि अटी व शर्ती
स्पर्धकांसाठी खालील दोन महत्त्वपूर्ण विषय देण्यात आले आहेत: १. ‘विकसित भारत २०४७ : शाश्वत मत्स्य व्यवसायाची दिशा आणि उद्दिष्टे’ २. ‘तंत्रज्ञानाच्या साथीने मत्स्यक्षेत्राचा विकास : विकसित भारताकडे वाटचाल’
स्पर्धेची नियमावली:
- पात्रता: इच्छुक स्पर्धक हा मच्छीमार सहकारी संस्थेच्या सभासदाचा मुलगा किंवा मुलगी (पाल्य) असणे बंधनकारक आहे.
- शब्दमर्यादा व भाषा: स्पर्धकाने वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर मराठी भाषेत ११०० ते १२०० शब्दांत निबंध सादर करायचा आहे.
- नियम: एका स्पर्धकाला केवळ एकाच विषयावर एक निबंध सादर करता येईल. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
आकर्षक रोख पारितोषिके अन् सन्मान
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या गुणवंत विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी आपले निबंध १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी यांच्या कार्यालयात सादर करायचे आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 07-10-2026














