रत्नागिरी : अंगणवाडीसमोरील सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला एका दगडावर बसून दारु पिणाऱ्या ६२ वर्षीय वृद्धावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिवाकर दत्तात्रय शेवडे (रा. देऊळ-चाटवळवाडी, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे.
ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली. दिवाकर शेवडे हे दारु पिण्याचा परवाना नसतानाही दारु पित बसले होते. याप्रकरणी अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 22/Apr/2025














