रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मोबाइल प्रशिक्षण कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.
इंटरनॅशनल लोंगेविटी सेंटर इंडिया (पुणे) यांनी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांसाठी दोन दिवसांची ज्येष्ठ नागरिक मोबाइल प्रशिक्षण कार्यशाळा संघाच्या सभागृहात आयोजित केली होती.
संस्थेतर्फे सर्वश्री सुशांत सोनवणे, नंदकुमार सकट आणि विलास शिंदे यांनी कार्यशाळेतील सहभागी ज्येष्ठांना स्मार्टफोन कसा वापरायचा, कोणती ॲप्स वापरायची नाहीत, कोणती ॲप्स धोकादायक आहेत, याविषयी समग्र बोधप्रद माहिती प्रात्यक्षिकासह दिली.
कडक उन्हाळा असूनही ३५ ज्येष्ठ नागरिक या प्रशिक्षणाला उपस्थित होते. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थित ज्येष्ठांनी रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघांचे आभार मानले.
संघातर्फे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी इंटरनॅशनल लोंगेविटी सेंटर ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रघुनाथराव माशेलकर,कार्याध्यक्ष जयंत उमराणीकर, कार्यकारी संचालिका श्रीमती अंजली राजे यांचे आभार मानले.
ही संस्था ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविते. अशा अन्य उपक्रमात रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ नेहमीच सहभागी होईल, असे आश्वासन अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 23-04-2025














