संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे-नांदळज या मुख्य रस्त्याला असलेल्या शिवणेफाटा ते शिवणे प्राथमिक शाळा शिवणे नं. २ पर्यंतचा अडीच किमी रस्ता हा पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्याचे सुमारे २८ वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते. त्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही.
या रस्त्यावरुन शिवणे-गवळीवाडी येथील ग्रामस्थ प्रामुख्याने दररोज प्रवास करत असतात. तसेच गावातील होरंबेवाडी, सनगरेवाडी, गुरववाडी येथील नागरिकांचीदेखील कामानिमित्त सतत ये-जा चालू असते. रस्त्याची दुरुस्तीसाठी शिवणे येथील ग्रामस्थांनी याआधी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला असून, त्यांच्या पदरी केवळ निराशाच आली आहे. शिवणे गावातील हा मुख्य रस्ता आहे; परंतु या रस्त्यावरून टु व्हीलर, फोर व्हीलर सोडाच साधे पायी चालणेदेखील कठीण झाले आहे.
विद्यमान आमदारांनी २०१८ मध्ये येथील ग्रामास्थांना हा रस्ता डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप त्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 23/Apr/2025














