खेड : तालुक्यातील वाडीबीड सुतारवाडी येथे २१ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपासून ते २२ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने घराचे लोखंडी ग्रील उचकटून आत प्रवेश केला आणि देव्हाऱ्याच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली ५ हजार रुपयांची रोकड व सुमारे एक तोळ्याची सोन्याची चैन, असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी नितीन जयराम साळवी (वय ३५, व्यवसाय नोकरी, सध्या रा. पुणे, मूळ रा. वाडीबीड सुतारवाडी) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांनी सतिश पांडुरंग ताम्हणकर (वय ३६, रा. वाडीबीड सुतारवाडी) याच्यावर चोरी केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने फिर्यादीच्या घराचे लोखंडी ग्रील काढले आणि घरात प्रवेश करून चोरी केली. आपण वाचत आहात ग्रामीण वार्ता.चोरीस गेलेल्या मालामध्ये ५०० रुपयांच्या ५ हजार रुपयांच्या नोटा आणि सुमारे ७० हजार रुपये किंमतीची एक तोळ्याची सोन्याची चैन आहे. या घटनेप्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:26 23-04-2025














