खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणे नाका येथील पुलावर मंगळवारी दि. २२ रोजी रात्री ९.२५ वाजण्याच्या सुमारास अॅसिड वाहून नेणारा कंटेनर उलटला. यावेळी चालक जखमी झाला असून अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई गोवा महामार्गावरून मंगळवारी दि. २२ -रोजी जाणारा कंटेनर (एमएच ४३ बीआर ०९९२) वरील चालकाचे नियत्रंण सुटून भरणे नाका येथील पुलावर उलटला.
कंटेनरमध्ये भरलेले सिड बाहेर पडल्याने महामार्गावर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शीनी खेड पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. फायरमन दीपक देवळेकर, श्याम देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव, सहायक फायरमन प्रणय रसाळ, प्रणव घाग यांनी घटनास्थळी पोहोचून रस्त्यावर पडलेल अॅसिडवर पाण्याचे फवारे मारले. यावेळी पुलावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गांधी व वहातुक पोलिसांनी देखील सहकार्य केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 24/Apr/2025














