रत्नागिरी : मच्छिमार्केट- चर्च रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना गावठी दारू बाळगणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : शहरातील मच्छिमार्केट ते चर्च रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर विना परवाना गावठी दारु विक्रीसाठी बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७.४५ वा. सुमारास करण्यात आली. स्वप्नील पांडुरंग मयेकर (४८, रा. सुर्वेवाडी मच्छिमार्केट, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस हवालदार वैभव नार्वेकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी संशयित हा आपल्या ताब्यात ५५० रुपयांची ५ लिटर गावठी दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 24/Apr/2025