देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात मानव शरीरसंबंधी नवी एक्झिबीटस्

देवरुख : शहरातील सृजन सायन्स सेंटरमधील जीवशास्त्र प्रयोगशाळेत मानव शरीरावरील चार नवीन एक्झिबिटस् आणण्यात आली आहेत. मानवी शरीर, हृदय, कान आणि डोळा हे कृत्रिम अवयव सेंटरमध्ये मांडण्यात आले असल्याची माहिती देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली आहे.

एक वर्षापूर्वी कोकणातील पहिले विज्ञान संशोधन केंद्र सृजन सायन्स सेंटर या नावाने उभारण्यात आले. या सेंटरमध्ये अवकाश सफर, सेंटरचा शुभारंभ झाल्यापासून एक वर्षांमध्ये सुमारे ५.५० हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक विज्ञानप्रेमी यांनी भेटी देऊन सेंटरची संपूर्ण माहिती घेतली आहे.

या सेंटरमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व संशोधनाची वृत्ती वाढावी यासाठी हे संशोधन केंद्र गेली एक वर्ष प्रयत्नशील आहे.

भेट देणाऱ्या विद्यार्थी व विज्ञान प्रेमींनी सेंटरला भेट दिल्याबद्दल आनंद देखील व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून सेंटरमध्ये नवनवीन उपक्रम देखील राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून जीवशास्त्र या विषयाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यात मानव शरीर व डोळे, कान, नाक या इंद्रियांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी कृत्रिम अवयव सेंटरमध्ये मांडण्यात आले आहेत.

विज्ञान विषयातील जीवशास्त्र विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीराची सहज ओळख होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सेंटरचा व नवीन उपक्रमाला भेट द्यावी असे आवाहन भागवत यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 24/Apr/2025