रत्नागिरी : विना परवाना नॅनो गाडी बेदरकरपणे चालवून अपघात करत स्वतः च्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार २३ एप्रिल रोजी सायंकाही ७.१५ वा. सुमारास कासारवेली येथील सोनारवाडी येथील वळणावर घडली.
सुरेश कुमार (२८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सुशांत नारायण पवार (३९) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी सुरेश कुमार हा विना परवाना तसेच नॅनो कार (एमएच-०८-एव्ही-७०८७) ची कोणतीही कागदपत्रे सोबत नसताना बेदरकारपणे गाडीतळ ते खंडाळा अशी घेउन जात होता. तो कासारवेली-सोनारवाडी येथील वळणावर आला असता त्याचा गाडीवरील ताबा सूटला आणि गाडीचा अपघात झाला. यात त्याच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 25/Apr/2025














