रत्नागिरी : बेकायदेशिरपणे तब्बल १२ हजारांची विदेशी दारु विक्रीसाठी बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार २३ एप्रिल रोजी दुपारी २.३० वा. सुमारास झाडगाव येथील आदित्य रेस्टॉरंटच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली.
संतोष उर्फ चिम्या दामोदर साबळे (४८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल अनुप पाटील याने तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा झाडगाव येथील एका रेस्टॉरंटच्या मागील बाजूस आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे दारुसाठा ठेवला असल्याने ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 25/Apr/2025














