दापोली : कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी वानर व माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी दापोली व रत्नागिरी येथे स्वतंत्र केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपसचिव विवेक होसिंग, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम, विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, दापोली ग्रामोद्योग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक विनायक महाजन, मिलिंद लिमये, वन्यजीव अभ्यासक संतोष महाजन आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 25/Apr/2025














