खेड : चारचाकी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीस अडथळा करणाऱ्यावर गुन्हा

खेड : शहरातील गांधीचौक ते तीनबत्ती नाका रस्त्यावरील पानगल्ली दुकानासमोर सुधीर सीताराम वैराग (वय ४३) यांनी चारचाकी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून ठेवली होती. त्याचा अन्य वाहनांना अडथळा होत होता.

ही गोष्ट लक्षात आल्यानंतर खेड पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई संपत मच्छिंद्र गीते (२८) यांनी वैराग यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार खेड पोलिसांनी संशयित सुधीर सीताराम वैराग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 25/Apr/2025