दापोलीत नेटवर्कचा गोंधळ कायम

दापोली : दापोली तालुक्यात विविध ठिकाणी सध्या पर्यटक येऊ लागले आहेत. मात्र, हर्णै, पाजपंढरी, सालदुरे, मुरूड याठिकाणी मोबाईलला नेटवर्कच मिळत नसल्याने पर्यटकांना आणि येथील व्यावसायिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

स्थानिकांना याचा फटका सतत बसतोच आहे. आता पर्यटकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. आताच्या काळात रोख रक्कम बाळगण्यापेक्षा सर्वचजण ऑनलाईन पेमेंटवर अधिक भर देतात. मात्र नेटवर्कअभावी ऑनलाईन पेमेंट तसेच अन्य आर्थिक व्यवहारात अडथळा येत आहे. या समस्येतून लवकर सोडवले जावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 25/Apr/2025