रेल्वेत बसण्यास जागा न दिल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात मारला लोखंडी रॉड

रत्नागिरी : रेल्वेत आसनावर बसण्यास जागा न दिल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याला जखमी केले. ही घटना २३ एप्रिल रोजी रात्री ११.२४ वा. सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे घडली. सागर सुरेश पवार (२७, रा. साखरीनाटे खुर्द, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात कौसलसिंग डागुर (३६, रा. खिपकापुरा जगत जि. करोली, राजस्थान) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, तो हजरत निजामुद्दीन रेल्वेतून प्रवास करत होता. ही रल्वे बुधवारी रात्री ११.२४ वा. सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर थांबून सुरु होताच संशयित सागर पवारने फिर्यादीकडे सीटवर बसण्यास जागा मागितली. परंतु, कौसल सिंगने त्याला जागा न दिल्याने हा प्रकार घडला. अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 26/Apr/2025