चिपळूण : खेर्डी एमआयडीसीमधील कचरा, अनधिकृत भंगारवर होणार कारवाई

चिपळूण : भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष विनोद भुरण व खेर्डी शक्तीकेंद्र प्रमुख विनय (बाळा) दाते यांनी खेर्डी एमआयडीसीचे उपअभियंता यांची भेट घेतली व एमआयडीसी येथे मोठ्या प्रमाणात टाकण्यात येणारा कचरा त्या संदर्भात CCTV चे नियोजन करणे, भंगारवाल्यांचा वाढता प्रादुर्भाव तसेच भंगारवाल्यांचा रस्त्यालगत असलेले अतिक्रमण हटवणे. कंपन्यामध्ये काम करणाऱ्या बांगलादेशी विरोधात तक्रार अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी खेर्डी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजेश शिंदे, खेर्डी ग्रामपंचायत चे माजी सरपंच रविंद्र फाळके, भाजपा युवामोर्चा तालुका सरचिटणीस संकेत चिले, अनिकेत महाडिक, मंगेश चिले, प्रसाद वरेकर आदि उपस्थित होते.

शिवसेना शिंदे गटाचे अशोक पवार यांनीही या प्रकरणी आवाज उठवला होता. त्यानुसार कार्यवाही सुरु झाली असून ग्रामपंचायतीनेही नोटीस काढली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 26/Apr/2025