ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

राजापूर : घराजवळच तीव्र उतारावर ट्रॅक्टर उलटल्याने त्याखाली चिरडून चालक जागीच ठार झाल्याची घटना शुकवारी सकाळी शहरातील वरचीपेठ येथे घडली. प्रमोद पांडुरंग मांजरेकर (वय ५१) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ट्रक्टर चालकाचे नाव आहे. प्रमोद याच्या वरचीपेठ येथील घरासमोरच ही घटना घडली. या घटनेने वरचीपेठ परिसरासह राजापूर शहरावर शोककळा पसरली आहे.

शहरातील वरचीपेठ येथील प्रमोद मांजरेकर हे चालक असून शुकवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी आपला ट्रॅक्टर व्यवसायासाठी जाणेकरिता बाहेर काढला. या ठिकाणी त्यांच्या घराला लागून तीव्र उताराचा रस्ता असून या उतारावर प्रमोद याचा अचानक ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने तो उलटला. यामध्ये प्रमोद हा या ट्रॅक्टरच्या पुढच्या भागाखाली आला व चिरडला गेला. या घटनेने हादरून गेलेल्या मांजरेकर कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

प्रमोद मांजरेकर याच्या अंगावर उलटलेला यावेळी घटनास्थळी उपस्थित तरूणांनी प्रमोद ट्रॅक्टर उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. अखेर जेसीबी आणून त्याच्या सहाय्याने ट्रॅक्टर उचलून बाजूला करून प्रमोद यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच प्रमोद त्यांची प्राणज्योत मालवली होती.

कुटुंब सांभाळणारा कर्ता पुरूष घरातून गेल्याने मांजरेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डेंगर कोसळला आहे. प्रमोद याने काहीकाळ राजापूर नगर परिषदेतही कंत्राटी चालक म्हणून काम केले होते. प्रमोद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, भाऊ असा मोठा परिवार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 26/Apr/2025