दापोलीत दोन विवाहित पाकिस्तानी महिला

दापोली : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या नागरिकांना देश सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार प्रशासनाने पाकिस्तानी नागरिकांची पडताळणी सुरू केली आहे.

यात दापोलीत दोन पाकिस्तानी महिला आढळून आल्या आहेत. मात्र, आठ ते दहा वर्षांपूर्वी त्यांचे भारतीय व्यक्तीशी लग्न झाले असल्याची दापोली पोलिसांनी दिली.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याच्या सूचना दिल्या. यानुसार केलेल्या पडताळणीत हर्णे येथे एक व दापोली शहरात अशा दोन पाकिस्तानी महिला आढळल्या आहेत.

या महिलांचे भारतीय व्यक्तीशी लग्न झाली आहेत. यामध्ये उरुसा चिकटे ही कराचीमधील असून त्यांनी शहानवाज बटे यांच्याशी विवाह केला आहे. तर आशिया बानू हाजी अन्वर अकबानी या हर्णे येथे पतीसोबत वास्तव्यास आहेत. या दोन्हीही महिलांनी आपल्या व्हीसाच्या मुदत वाढीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:43 AM 28/Apr/2025