गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील मानेवाडीत राहणाऱ्या संदीप सोनू रावणंग या ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (२६ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास घडली.
अधिक माहितीनुसार संदीपने २६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास घरातील बेडरूममध्ये वाशाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
अविनाश नारायण माने यांनी याची माहिती गणपतीपुळे पोलिस चौकीला दिली. पोलिसांनी संदीपला प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे नेले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांनी प्राथमिक तपासणी करून संदीप मृत झाल्याचे सांगितले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे पाठवण्यात आला.
जयगड पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. जयगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील व गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी व नीलेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल घोरपडे अधिक तपास करत आहेत. संदीपच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व बहिणी असा परिवार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:49 AM 28/Apr/2025














