सावर्डेत आज जलव्यवस्थापन कृती पंधरवडाअंतर्गत शिबिर

चिपळूण : शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या माध्यमातून जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत सोमवारी (दि. २८) सकाळी ९ वा. शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर सावर्डे येथील गोविंदराव निकम उच्च माध्यमिक विद्यालय येथे होणार आहे. यावेळी विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

सावर्डे येथील गोविंदराव निकम विद्यालयात आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळच्या पहिल्या सत्रात नावनोंदणी, त्यानंतर शिबिराचे उद्घाटन, जलप्रतिज्ञा होणार आहे. यावेळी आमदार शेखर निकम मार्गदर्शन करणार आहेत तर प्रस्तावना उपविभागीय अधिकारी सत्यजित गोसावी हे करतील.

सकाळी १०:३० वा. पाणी वापर संस्था व त्यांचे सक्षमीकरण या विषयावर छत्रपती संभाजीनगर येथील निवृत्त प्रा. रेवा भारसवाडकर, त्या नंतर ‘कोकणातील पिके, फळबागा तसेच बारमाही शेती’ या विषयावर कृषी अधिकारी मनोज गांधी, आपत्ती व्यवस्थापन विषयावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, शेवटच्या सत्रात ‘जल व नैसर्गिक जलस्रोतांचे महत्त्व व प्लास्टिक मुक्तीची आवश्यकता’ या विषयावर जलदूत शाहनवाज शाह मार्गदर्शन करतील. या नंतर आभार प्रदर्शनाने शिबिराची सांगता होणार आहे.

या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आहे. करण्यात आले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 28/Apr/2025