संगमेश्वर : भाई हेगशेट्ये कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी बनवली सुगंधी अत्तरे

देवरूख : नवनिर्माण शिक्षण संस्था संचालित भाई हेगशेट्ये ज्युनिअर कॉलेज संगमेश्वर कॉलेजमध्ये सुगंधी अत्तरे (परफ्यूम) बनवणे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे गिरवण्यात आले.

प्राचार्या संजना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांनी सुगंधी अत्तरे बनवली. प्रशिक्षण शिबिरात प्राध्यापक पृथ्वीराज वाडकर यांनी प्रात्यक्षिक दाखवले. त्यावेळी त्यांनी परफ्यूम कसे बनवावे आणि परफ्यूम बनवताना कोणती काळजी घ्यावी, याचे सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून परफ्यूम बनवून घेतली.

सेजल फटकरे, सिद्धी सावर्डेकर, रिया सावंत, आर्या जोगळे, गौरी वेल्हाळ, सम्यक मोहिते, सोहम नलावडे हे विद्यार्थी सहभागी होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 28/Apr/2025