खेड : सवेणी-धनगरवाडीचा टँकरसाठी अर्ज

खेड : तालुक्यातील सवेणी-धनगरवाडी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. टँकरच्या प्रतीक्षेत असलेल्या गाववाड्यांची संख्या पाच झाली असून, अजूनही केवळ दोन गावांतील वाड्यांमध्येच पाण्याचा टँकर धावत आहे. वावे-ढेबेवाडी, कुळवंडी-शिंदेवाडी, चिरणी-धनगरवाडी, गुणदे-काळकाईवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 28/Apr/2025