पालीत उद्यापासून कलशारोहण सोहळा

पाली : पाली-पाथरट गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी पल्लीनाथ व श्री करंबेळदेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा व कलशारोहण सोहळ्याचा १६ वा वर्धापनदिन ३० एप्रिलपासून सुरू होणार आहे. हा कार्यक्रम १ मे रोजी पाली येथील मुख्य मंदिरात होणार आहे.

या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले ३० रोजी श्री लक्ष्मी पल्लीनाथ मंदिरात सकाळी ९ ते १२ पर्यंत श्रींवर लघुरूद्र अभिषेक, दुपारी १२ ते १२.३० वा. नैवेद्य व आरती, १२.३० ते १.३० पर्यंत मंदिरासभोवती ढोल-ताशांच्या गजरात भोवत्या आणि १.३० ते ३ पर्यंत महाप्रसाद व रात्री ९ ते १०.३० स्थानिक भजन असा कार्यक्रम होणार आहे.

१ मे रोजी श्री करंबेळदेव मंदिरात सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत श्रींवर लघुरूद्र अभिषेक, दुपारी १२ ते १२.३० वा. नैवेद्य, आरती, १२.३० ते १.३० वा. मंदिराभोवती ढोलताशांच्या गजरात प्रदक्षिणा, १.३० ते ३ वा. पर्यंत महाप्रसाद व रात्री ८.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचे मुख्य मानकरी व अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 29/Apr/2025