उड्डाणपुलाच्या कामामुळे चिपळुणात धुळीचे लोट

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहरात उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुलाच्या कामासाठी मातीचे खोदकाम सुरू असल्यामुळे महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे वाहनचालकांसह प्रवासी, स्थानिक नागरिक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

धुळीचा त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावर पाण्याची फवारणी करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामागांचे चौपदरीकरण मागोल १७ वर्षांपासून सुरू आहे. शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला मागील काही दिवसांपासून वेग आला आहे.

उड्डाणपुलाचे डिझाईन बदलल्यामुळे कामाला उशीर झाला असला तरी सध्या कामाला गती आहे. प्रांताधिकारी कार्यालयासमोर सध्या मातीचे खोदकाम केले जात आहे. त्या ठिकाणी उड्डाणपूल उतरणार असल्यामुळे येथे इतर भागांतून माती आणून टाकण्यात आले आहे. पोकलेनच्या साहाय्याने माती खोदताना आणि डंपरच्या साहाय्याने इतर भागांतील माती त्या ठिकाणी आणताना धुळीचे साम्राज्य तयार होते. या बुद्धीचा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना त्रास होतो. दुचाकीस्वारांना पुढचा रस्ताही दिसत नाही. या खुळीमुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे.

प्रांताधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये नागरिकांची घरे आहेत. डाणपुलाच्या कामातून निघणारी धूळ या घरात जाते.

दुकानदारांना त्रास
दुकानदारांच्या साहित्यावरही धूळ बसते. त्यामुळे दु‌कानदारांना एकतर आपले साहित्य झाकून ठेवावे लागते नाहीतर काम सुरू असताना चक्क दुकान बंद करावे लागते. त्यामुळे दुकानदारांचेही आर्थिक नुकसान होत आहे. या धुळीमुळे सर्दी, दमा, खोकला, घशाचे आजार, डोळ्यांच्या आजारांनी डोके वर काढले आहे. या भागातून पायी आणि दुचाकीवरून जाणारे तोंडाला मास्क लावून प्रवास करतात.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान चिपळूण शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. येथे मातीकाम सुरू असताना त्यातून धूल निर्माण होत आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. उड्डाणपुलाच्या कामाता आमचा विरोध नाही: परंतु धुळीवर उपायोजना केल्या पाहिजे. रात्रीचे काम केले तरी चालेल म्हणजे दिवसा प्रवाशांना त्रास होणार नाही. दिवसातून एकदातरी पाणी मारावे म्हणजे धूळ तयार होणार नाही- धनंजय जोशी, रॉयलनगर, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 30/Apr/2025