दापोली नगर पंचायत कार्यक्षेत्रातील उद्यानाला धर्मवीर छ.संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी

दापोली : दापोली नगर पंचायत कार्यक्षेत्रात दापोली-दाभोळ रस्त्यानजीक स्टेट बँक दापोलीसमोर नव्याने उद्यान बांधण्यात आले आहे. या उद्यानाला थोर पुरुषांचे नाव असावे, अशी मागणी लांजेकर यांची मागणी आहे. तर दापोली नगर पंचायत हद्दीमध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या नावे एकही उद्यान अथवा स्मारक नाही.

त्यामुळे या उद्यानाला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी दापोली नगर पंचायतीच्या नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी अमोल लांजेकर यांनी पत्राद्वारे नगर पंचायतीचे मुख्यधिकारी आणि नगराध्यक्ष यांचेकडे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 30/Apr/2025