रत्नागिरी : भगवती बंदर, किल्ला येथील राजवाडी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या. या स्पर्धेचा अंतिम सामना भगवती स्पोर्ट्स किल्ला विरुद्ध यंग बॉईज फगरवाठार यांच्यात झाला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात यामध्ये यंग बॉईज फगरवठार संघ विजयी ठरला.
रत्नागिरीतील भगवती बंदर किल्ला येथे दरवर्षी अक्षय्यतृतीयानिमित्त राजवाडी क्रीडा मंडळ या स्पर्धेचे भव्य आयोजन करत असते. यावर्षी या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा बक्षीस समारंभ राजवाडी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर, उपाध्यक्ष प्रवीण दळवी, माजी नगरसेवक संतोष कीर, राकेश नागवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रतीक मोंडकर, संदेश सारंग, संतोष डोके, विजय चव्हाण, श्रीकांत सारंग, प्रवीण बापर्डेकर आदी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजवाडी क्रीडा व सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 30/Apr/2025














