कशेडी घाटात आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

खेड : मुंबई गोवा -राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात पोलादपूर बाजूला भोगाव येथे बुधवार दि.३० रोजी सुमारे ५५ वर्ष वयाच्या एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. अनोळखी व्यक्तीचा घातपात की आत्महत्या, याबाबत गूढ निर्माण झाले आहे.

याबाबत भोगाव पोलिस पाटील शुभांगी उतेकर यांनी या घटनेची माहिती पोलादपूर पोलिस ठाण्याला कळली. पोलादपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद रावडे व पोलिस हवालदार आर. के. सहनेकर, संग्राम बामणे, तुषार सुतार, सौरव जाधव, यांनी घटनास्थळी पाहणी केली. या घटनेचा पंचनामा झाला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 01/May/2025