चिपळूण : क्षुल्लक कारणावरून मारहाण; दोघांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील कुडप-शिर्केवाडी येथे क्षुल्लक कारणावरून दोघांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या नरेश सुरेश राजेशिर्के आणि परेश सुरेश राजेशिर्के (दोघेही रा. कुडप-शिर्केवाडी) याच्या विरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कमलेश उत्तमराव गायकवाड (३२, रा. पाचांबे) यांनी पोलिसात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश गायकवाड हे त्यांच्या आत्याच्या घरी कुडप-शिर्केवाडी येथे जेवणासाठी गेले होते. रात्री ८:३० वाजता कमलेश यांची वहिनी प्राची राजेशिर्के जेवण घेऊन आली असता, कमलेश यांनी तिला ‘मला उशिरा जेवण घेऊन का आलीस’ असे म्हणून फटकारले. याच कारणावरून नरेश राजेशिर्के आणि परेश राजेशिर्के यांनी कमलेश यांच्याशी वाद घातला आणि त्यांना मारहाण केली. याप्रकरणी सावर्डे पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 01/May/2025