खेड रेल्वेस्थानकात मंगळसूत्र चोरीला

खेड : येथील रेल्वे स्थानकावर गाडीमध्ये शिरत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने विवाहितेचे १ लाख ३५ हजार रुपयाचे मंगळसूत्र चोरले.

ही घटना २५ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी रोशनी बाळाराम गुरव (४३, मूळ गाव कोचरी, लांजा, सध्या रा. मालाड पूर्व) यांनी खेड फिर्याद दाखल केली आहे. या महिलेच्या पर्समधील मंगळसत्र चोरट्याने चोरून नेले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 01/May/2025