चिपळूण : टेरव येथील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

चिपळूण : टेरव येथील नितीन तुकाराम सावंत (वय ४५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते अशक्तपणामुळे १६ एप्रिल २०२५ रोजी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.

सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम वाघदरे यांनी तपासणी करून ३० एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता नितीन सावंत यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३३/२०२५ अन्वये करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 02/May/2025