माखजन : कासे गोताडवाडी मार्गे पुर्ये शिरबे भागातील ग्रामस्थ तसेच नायशी हायस्कूलमध्ये ये-जा करणारे विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या अत्यंत वाईट अवस्थेमुळे त्रस्त होते. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी घेतली. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे.
रस्त्याला मोठे खड्डे पडल्यामुळे ग्रामस्थांकडून अनेक वर्षे पाठपुरावा करूनही या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नव्हती, संबधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही याकडे लक्ष देत नव्हते. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज होती. प्रशांत यादव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांची समस्या दूर झाली आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शिरंबे, पुर्ये आणि आसपासच्या गावांमधून जाणारी एसटी बसफेरी जून महिन्यापासून बंद होती, ती पुन्हा पूर्ववत सुरू होईल, यामुळे ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामात मोलाचे सहकार्य केलेल्या प्रशांत यादव तसेच संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी युवक सरचिटणीस प्रथमेश शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 10/Oct/2024
