माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन बसस्थानकात येणाऱ्या रत्नागिरी माखजन-करजुवे आणि गुहागर-चिपळूणमार्गे-माखजन या बस फेऱ्या तत्काळ सुरू करा, अशी मागणी माखजन परिसरातून होत आहे.
या दोन्ही फेऱ्या वर्षानुवर्षे सुरू होत्या. पण टप्प्याटप्प्याने या बसफेऱ्या भारमान असूनदेखील विनाकारण थांबवण्यात आल्या. या बसफेऱ्या सुरू कराव्यात यासाठी प्रवासी संघटनेचे संतोष पाडळकर यांनी संबंधितांकडे सातत्याने पत्रव्यवहार केला आहे.
माखजन ग्रामपंचायतीनेदेखील पत्रव्यवहार केल्याचे सरपंच महेश बाष्टे यांनी सांगितले. एसटीने याची दखलच घेतली नसल्याने संतोष पाडळकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना १० ऑगस्ट २०२४ रोजी पत्र दिले होते. त्या पत्रावर विनंती मान्य करावी, असा डी. सी. रत्नागिरी यांना मंत्री उदय सामंत यांनी शेरा मारला होता. परंतु, ९ महिने उलटले तरी खुद्द पालकमंत्र्यांच्या शेऱ्याची दखल परिवहन विभागाने न घेतल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 07/May/2025














