एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा 28 ला रत्नागिरीत स्नेहमेळावा

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, रत्नागिरी आगार व टीआरपी येथून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा तालुकास्तरीय स्नेहमेळावा येत्या २८ जूनला सकाळी १० वाजात दत्तमंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यामध्ये जूनमध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत अशा सुमारे ४४ सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात येणार आहेत. निवृत्त झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी इतर क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा सभासदांचेही सत्कार करण्यात येणार आहेत. येथे भोजनव्यवस्था केली आहे. रत्नागिरी आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या सभासदांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:19 25-06-2026