खेड : तालुक्यातील जामगे येथील कोटेश्वरी मानाई देवीच्या उत्सवास ११ मे पासून प्रारंभ होणार आहे. होममिनिस्टर कार्यक्रमात पैठणीसह पारितोषिकांची लयलूट करण्याची संधी प्राप्त होणार आहे. १३ रोजी उत्सवाची सांगता होईल.
११ रोजी सायंकाळी ७ वा. माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांच्या सौजन्याने चला खेळूया होममिनिस्टर कार्यक्रम होईल. सादरकर्ते किशोर सावंत आहेत. यामध्ये महिलांना पैठणी व आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी प्राप्त होणार आहे.
१२ रोजी सकाळी ९ वा. नवचंडी यज्ञ, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या सौजन्याने ‘थेट तुमच्या घरातून’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम, १३ रोजी सकाळी १० वा. सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ वा. महाप्रसाद व भंडारा, सायंकाळी ४ वा. देवीची पालखी व मिरवणूक, रात्री ८ वा. सत्कार, ९ वा. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सौजन्याने मंगलगाणी-दंगलगाणी कार्यक्रम होईल.
याप्रसंगी शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या अध्यक्षा ज्योती, कदम, श्रेया कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, उद्योजक शैलेश कदम आदी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 10/May/2025
