रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यासाठी बसलेल्या दोघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.२५ ते ५.३० वा. कालावधीत करण्यात आली.
सुरेंद्र सुरेश वामनसे (२२, रा. पावस नालेवठार, रत्नागिरी) आणि आकाश काशीनाथ आग्रे (२४, रा. मावळंगे नातुंडे, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ते पावस येथे दारू पिताना आढळले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:54 AM 11/Oct/2024