दापोली : दापोलीत महाविद्यालयीन युवतीची छेड काढणाऱ्या वाहकाला अखेर राज्य परिवहन महामंडळाने निलंबित केले आहे. दापोली तालुक्यातील एसटीमध्ये बुधवारी माजिद तांबोळी या वाहकाने एका महाविद्यालयीन युवतीची छेड काढली होती.
या प्रकरणी त्या वाहकाला भारतीय न्याय संहिता ७४ व पॉस्को कायद्यांतर्गत अटक केली होती. गुरुवारी त्याला राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून निलंबित केल्याची माहिती दापोली आगार प्रभारी व्यवस्थापक मुनाफ राजापकर यांनी दिली. तपास दाभोळ सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 11-10-2024
