रत्नागिरी : ट्रकच्या मागील हौद्याची धडक बसून जखमी झालेल्या दुचाकीवरील दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची ही घटना गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी दुपारी ११.४५ वा. सुमारास आडीवरे ते नाटे जाणाऱ्या रस्त्यावरील चढावात घडली.
सागर अमरनाथ मिरजुळकर (२८) त्याची आई अक्षता अमरनाथ मिरजुळकर (४८, दोन्ही रा. गावडे आंबेरे खारवीवाडा, रत्नागिरी) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. गुरुवारी दुपारी सागर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८- बीएफ-६५६७) वरुन त्याची आई अक्षता मिरजुळकर यांना घेऊन जैतापूर येथे दवाखान्यात जात होता. तो आडीवरे येथील महाकाली मंदिरापुढील चढावातून जात असताना समोरून येणारा ट्रक (एमएच-१०-एडब्ल्यू-७३०९) वरील चालकाने उतारात अचानकपणे ब्रेक लावला. त्यामुळे टूक काही अंतर स्लीप होऊन पुढे जात असताना ट्रकचा मागील हौद्या सागरच्या दुचाकीवर धडकला यात दुचाकीवरील माय-लेक जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 11/Oct/2024
