संगमेश्वर : शिक्षिका व माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या महिलांचा सन्मान

देवरुख : भाजपा महिला मोर्चा, संगमेश्वर दक्षिण यांच्यातर्फे शिक्षिका व माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

समाज जीवनात विविध क्षेत्रांत कार्यरत महिला व मदतनीस महिलांना नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने समाज घडणीत त्यांचा असलेला सहभाग याची जाणीव म्हणून नारीशक्तीचा जागर करावा या संकल्पनेतून भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शितल पंडित, स्वाती गोडे सरचिटणीस, संगमेश्वर दक्षिण मंडळ, यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

या निमित्ताने शाळेतील शिक्षिका व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी सतर्क कसे राहावे याचे मार्गदर्शन अॅड. स्वाती गोडे यांनी केले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा, कांगणेवाडी व जिल्हा परिषद शाळा, तळवडे येथे पार पडला.

तळवडे शाळेला ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात प्रथम पुरस्कार मिळाला. त्यात योगा आणि राखी प्रशिक्षण पंडित यांनी दिले. महिला शिक्षिका व मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या महिलांचा सन्मान म्हणून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानिमित्त पेढे वाटण्यात आले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 11/Oct/2024