गावतळे : विधानसभा निवडणुकीचे प्रशिक्षण दिवाळी सुट्टीपूर्वी घेण्यात यावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय फंड यांनी दापोली प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे दिले.
विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान दिवाळीचा सणही येत आहे. या कालावधीत सर्वचजणं त्यामध्ये व्यस्त असतात. महाराष्ट्रात या सणाला महत्त्व आहे. दिवाळी सणानिमित्त २७ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत सर्व शाळांना सुट्टी आहे. या सणासाठी शिक्षकांसह सर्व शासकीय कर्मचारी आपापल्या मूळ गावी जातात. अनेकांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी दोन महिने अगोदरच बस किंवा रेल्वेचे बुकिंग केले आहे. त्यामुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे होणारे प्रशिक्षण दिवाळी सुटीपूर्वी घेतले तर या कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही. तसेच निवडणूक संपेपर्यंत त्या कर्मचाऱ्यांना पुढे सुट्या मिळत नाहीत. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण घेतले तर त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण सुट्टीपूर्वी घ्यावे, अशी मागणी केली आहे. हे निवेदन प्रातांधिकाऱ्यांना देताना फंड यांच्यासह भूपेंद्र तलाठी, भालचंद्र घुले, वैभव बोरकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 11/Oct/2024
