साडवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायत सभागृहात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने रिक्षामालक चालक संघटना कडवई, तुरळ, चिखलीच्या सदस्यांना रस्ते सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने रस्ते अपघात व सुरक्षा यावर मार्गदर्शन केले.
कडवई येथे झालेल्या कार्यक्रमाला धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या सदस्यत्वाचे अर्ज वितरित करण्यात आले. या वेळी मोटरवाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे, सहाय्यक मोटरवाहन निरीक्षक सुशांत पाटील, मोहसीन आवटी, अवधूत कुंभार हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला रिक्षा संघटनेच्यावतीने उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मोटारवाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे यांनी रस्ते सुरक्षा अपघात व रिक्षा व्यावसायिकांची कर्तव्ये यावर मार्गदर्शन केले. संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 11/Oct/2024
