Paresh Rawal exit from Hera Pheri 3: सध्या अनेक सिनेमांच्या सीक्वेलची चर्चा आहे. मात्र चाहते एका सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते म्हणजे ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3). परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिकडीने २००० साली ‘हेरा फेरी’ सिनेमातून धमाल आणली.
नंतर २००६ साली ‘फिर हेरा फेरी’ मध्येही त्यांना तितकंच पसंत केलं गेलं. आता ‘हेरा फेरी ३’ च्या शूटला सुरुवात झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, परेश रावल यांनी सिनेमातून एक्झिट घेतली आहे.
‘बॉलिवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, परेश रावल ‘हेरा फेरी ३’ मधून बाहेर पडले आहेत. निर्मात्यांसोबत काही गोष्टींवरुन खटकल्याने त्यांनी सिनेमा सोडला आहे. क्रिएटिव्ह डिफ्रंसमुळे ते बाहेर पडल्याचं आता समोर आलं आहे. परेश राव यांची सिनेमात बाबुराव आपटे ही मुख्य भूमिका आहे. या भूमिकेने त्यांना ओळखही मिळवून दिली. मात्र आता त्यांनी ‘हेरा फेरी ३’ करणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे चाहते निराश झालेत.
बाबुराव आपटे, श्याम आणि राजू ही तिकडी म्हणजे ‘हेरा फेरी’ सिनेमाचे कर्तेधर्ते आहेत. त्यांच्या अभिनयासाठीच प्रेक्षक सिनेमा पाहतात. सुरुवातीला ‘हेरा फेरी ३’ मध्ये अक्षय कुमार नसणार अशी चर्चा होती. स्क्रिप्ट आवडली नसल्याने त्याने सिनेमाला नकार दिला होता. मात्र नंतर त्याची अचानक सिनेमात एन्ट्री झाली. तिघांचा सेटवरील फोटोही व्हायरल झाला होता. तसंच लवकरच सिनेमाचा टीझर येईल अशीही चर्चा होती. आता त्याआधी परेश राव सिनेमातून बाहेर पडल्याची बातमी आल्याने सर्वांचीच निराशा झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 16-05-2025
