रत्नागिरी : शिल्लक रजेच्या पैशांसाठी एसटीत वेटिंग!

रत्नागिरी : निवृत्तीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी, शिल्लक रजेचे पैसे व वेतनवाढीतील फरक दिला जातो; मात्र अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शिल्लक रजेच्या पैशासाठी महामंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना रजा किती?
एसटीतील नियमित कर्मचाऱ्यांना दरवर्षी साप्ताहिक रजा, वैद्यकीय रजा व सानुग्रह रजा मिळतात. या रजांपैकी वापरात न आलेल्या रजांचे संचित होऊन त्या शिल्लक रजा म्हणून नोंदविल्या जातात. ३० ते ४० रजा असतात.

किती रजांचे पैसे मिळतात ?
सेवानिवृत्तीवेळी कर्मचाऱ्यांच्या अंतिम पगाराच्या हिशोबाने, शिल्लक रजांबाबत रकमेचा लाभ मिळतो. एका कर्मचाऱ्याला ३०० दिवसांपर्यंत शिल्लक रजांबाबत रकमेचा लाभ मिळतो. ही रक्कम एक ते दीड लाखापर्यंत असू शकते.

शिल्लक रजांचे पैसे कधी मिळतात?
सेवानिवृत्तीनंतर काही दिवसांतच सर्व निवृत्ती लाभ देणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात विविध टप्प्यातील प्रशासकीय प्रक्रिया व निधीच्या प्रतिक्षेमुळे कर्मचाऱ्यांना रक्कम वेळेवर मिळत नाही

एक वर्षांपासून वेटिंग
रत्नागिरी विभागातील काही कर्मचाऱ्यांना एक ते दीड वर्ष तर काहींना एक वर्ष झाले तरी अद्याप सेवानिवृत्ती वेतनाचे पैसे मिळालेले नाहीत. यासाठी कर्मचारी फेऱ्या मारत आहेत.

वेळेवर पैसे मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
रत्नागिरी विभागात नियमित कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहेत. एसटीच्या नियमित कर्मचाऱ्यांना दरवर्षी साप्ताहिक रजा, वैद्यकीय रजा, सानुग्रह रजा मिळतात. या रजांपैकी वापरात न आलेल्या रजांचे संचित होऊन शिल्लक रजा म्हणून नोंदविल्या जातात. सेवानिवृत्तीनंतर एक, दीड वर्ष होऊनसुद्धा कर्मचाऱ्यांना रजांचे पैसे न मिळत नाही. निधी नसल्याचे कारण सांगितले जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 19/May/2025