चिपळूण : जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाचं ‘मयुरपंख’ वक्तृत्व स्पर्धेत यश

चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण संचलित जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी – पालवण मधील गायत्री मांगडे द्वितीय वर्ष कृषी हिने शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव मयुरपंख 2024 वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवले आहे.

सर्व विजेते, सहभागी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे संघ व्यवस्थापक यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष – डॉ. निखिल चोरगे, संचालिका सौ. अंजलीताई चोरगे, डॉ. शमिका चोरगे प्राचार्या, जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, डॉ. संकेत कदम प्राचार्य, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी पालवण यांच्यावतीने आणि सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांच्याकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 11/Oct/2024