रत्नागिरी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी आयोजित राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्पाअंतर्गत जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा 2024 मध्ये दामले विद्यालयाच्या दोन संघांची विभाग स्तरावर निवड झाली आहे.
विभागाची स्पर्धा सातारा येथे लवकरच होणार आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर डायट प्राचार्य श्री. सुशील शिवलकर, ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीम. दीपा सावंत मुख्याध्यापक श्री. भगवान मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
आज रत्नागिरीत पार पडलेल्या दोन्ही स्पर्धांमध्ये शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक 15, दामले विद्यालयाने विजेतेपद पटकावले. या यशामुळे शाळेची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत दामले विद्यालयाने पर्यावरण गीतावर आदिवासी लोकनृत्य सादर केले, त्याला प्रथम क्रमांक तर भूमिका अभिनय स्पर्धेत वैयक्तिक सुरक्षा या स्कीटलाही प्रथम क्रमांक मिळाला.
या स्पर्धेत शाळेच्या शिक्षकांनी घेतलेल्या मेहनती बद्दल डायट प्राचार्य श्री. सुशील शिवलकर सर यांनी शाळेचे कौतुक केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:19 11-10-2024
