चिपळूण : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने लघुपाटबंधारे विभाग अंतर्गत सावर्डे, खोतवाडी येथे बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ आ. शेखर निकम यांच्या हस्ते दि. १२ रोजी सकाळी ९.३० वा. होणार आहे. सावर्डे व परिसरातील पाणी टंचाई कायमची संपविण्यासाठी या बंधाऱ्याचा मोठा उपयोग होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री उदय सामंत व अन्य मंत्र्यांच्या सहकार्यामुळे आ. शेखर निकम यांनी या लघु बंधाऱ्यासाठी ८४ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. या बंधाऱ्याच्या कामाचा प्रारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार आहे. सावर्डेतील पाणी टंचाई कायमची संपविण्यासाठी आ. निकम यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. याच ठिकाणी कोट्यवधीची पाणीपुरवठा योजनासुद्धा मार्गी लागली आहे. त्यामुळे भविष्यात सावर्डे टंचाईमुक्त होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 12-10-2024
