रत्नागिरी : ‘खल्वायन’चा आज २७ वा वर्धापनदिन

रत्नागिरी : खल्वायन संस्थेचा आज (ता.१२) २७वा वर्धापनदिन असून या निमित्त ३०६वी मासिक संगीत सभा सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.

प्रसिद्ध गायिका सूरमणी भाग्यश्री देशपांडे यांच्या शास्त्रीय ख्याल गायनाबरोबरच अभंग व नाट्यसंगीत गायनाने ही मैफल रंगणार आहे. (कै.) शामराव भिडे स्मृती मासिक संगीत सभा म्हणून ही मैफल होईल.

भाग्यश्री देशपांडे यांनी संगीत अलंकार व एमए (संगीत) या पदव्या प्राप्त केल्या आहेत. आकाशवाणीची बी (हाय) ग्रेड त्यांना प्राप्त आहे. त्यांना पंडित अजय पोहनकर व पंडित सुरेश वाडकर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण मिळाले आहे. सध्या त्या पंडित सुहास व्यास यांच्याकडून आग्रा व ग्वाल्हेर घराणे गायकीचे मार्गदर्शन घेत आहेत. सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, सुरसिंगार संसदचा सुरमणी, कर्नाटक सरकारचा बालसरस्वती, छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानचा संगीतरत्न, योगेश्वरी देवल कमिटीचा गानहिरा, नातू फाउंडेशनचा डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. त्यांना मैफलीत तबलासाथ हेरंब जोगळेकर व हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 12-10-2024