रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर-मजगाव रोड येथील ऑप्टिकल दुकानातून रोकड लंपास करणाऱ्या संशयितास शहर पोलिसांनी अटक केली. विठ्ठल घोडके असे संशयिताचे नाव आहे.
ही घटना सोमवारी (ता. ७) सायंकाळी चारच्या सुमारास यश ऑप्टिकल दुकानात घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित घोडके याने दुकानातील दहा हजाराची रोकड पळवली होती. या प्रकरणी फिर्यादी पंकज सुर्वे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 12-10-2024
