कोंडगाव बाजारपेठेत एकाच घरात दुसऱ्यांदा चोरी

साखरपा : कोंडगाव बाजारपेठेत एकाच घरात दोन महिन्यात दुसऱ्यांदा चोरी झाल्याचे उघडकीस आले. हा प्रकार मंगळवारी (ता. ८) रात्री घडला. स्मिता जितेंद्र शेडे (वय ४२) यांच्या घरी ही चोरी झाली.

शेडेंच्या घरातील माणसे रात्री गरबा पाहण्यासाठी गेली असता चोरट्यांनी घरात घुसून कपाट फोडून ६० हजारांची रक्कम लांबवली. शेडे घरी आल्यावर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. दोनच महिन्यांपूर्वी शेडे यांच्या घरात प्रथम चोरी झाली होती. रात्री उशिरा स्मिता शेडे या घराच्या मागे भांडी घासत असताना चोरट्यांनी घरात शिरून दागिने आणि रोख रक्कम चोरली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 12-10-2024

Mahrashi karve ANM