दापोलीत एसटी बस सेवेची वाताहत

दापोली : दापोलीत एसटी महामंडळाच्या बस सेवेची पुरती वाताहत झालेली दिसत आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी बस खिळखिळ्या झालेल्या आहेत. पावसाळ्यात गळक्या बस सेवेमुळे प्रवाशी ओलेचिंब होत असून आशा बस मधून प्रवास करताना प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे. तर प्रवासाची सुरवात करणाऱ्या चालक, वाहकांचा खराब टायर, गाड्यांची झालेली मोडतोड यामुळे उत्साह गळून पडताना दिसत आहे.

तालुक्याचा एसटी प्रवास हा ग्रामीण भागातील आहे. त्यात वस्तीच्या फेऱ्या देखील जास्त आहेत. मात्र, अनेकदा या फेऱ्या अर्ध्यावर थांबत आहेत. यामुळे शाळकरी मुले, वयोवृद्ध प्रवाशी यांचे चांगलेच हाल होत आहेत. या सगळ्या अडचणीत बस चालक, वाहकदेखील त्रस्त दिसत आहेत.

दापोली आगारातून बस सेवा वेळेत न सोडणे, आहेत त्या फेऱ्या बंद करणे आवश्यक असलेल्या ठिकाणी मागणी करूनही बस सेवा न पुरविणे, अशा असंख्य तक्रारी मागील महिन्यात झालेल्या खासदार सुनील तटकरे यांच्या आढावा बैठकीत ग्रामस्थानी उपस्थित केल्या होत्या. मात्र त्या वेळेस एसटी अधिकाऱ्यांनी हो हो करत तात्पुरती वेळ मारून नेली. मात्र पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अश अवस्था एसटी बस सेवेची आहे. तर खासदार सुनील तटकरे यांच्या सुचने नंतरही दापोली एसटी आगारचा कारभारत सुधारणा झालेली दिसत नाही.

दापोली आगारात काही महिन्यांपूर्वी नवीन बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जुन्या बसचा वनवास सुटेल असे चालकांना वाटत होते. मात्र जैसे थे परिस्थिती आहे. आशा वेळी खिळखिळ्या झालेल्या बस चालवताना चालकांची दमछाक होत आहे. बसस्थानकावर अशा भंगार बस ताब्यात घ्या अन् प्रवासाला निघा, असे फर्मान सोडले जाते. बसची अवस्था पाहिल्यानंतर अनेक चालक बस ताब्यात घेण्यास तयार होत नाहीत. यामुळे दुसऱ्या चालकाचा शोध घेतला जातो, या चालकाच्या शोधमोहिमेत बस गाड्या उशिराने निघतात. या सगळ्यात प्रवाशांचे मात्र कायम हाल होत आहेत.

Samarth gold

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 30/May/2025