रत्नागिरी : ‘एसएमएस’द्वारे ग्राहकांना वीज बिल

रत्नागिरी : महावितरणच्या ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात १० रुपयांची सवलत देण्यात येते. या योजनेत सहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत असल्याने जिल्ह्यातील ६ हजार ४६७ ग्राहकांनी ग्रो ग्रीन योजनेत सहभागी होत छापील बिल नाकारले आहे.

महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ते गो-ग्रीन योजनेतील ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठवण्यात येत आहे. एसएमएसद्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. यासोबत ग्राहकांनी प्रॉम्प्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीज बिल आतापर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ४६७ वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत ग्राहकांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या १५ अंकी क्रमांची नोंदणी महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे किंवा महावितरणला करावी. याबाबत अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. ई-ऑफिस प्रणालीमध्ये प्रत्यक्ष कागदावरचा वापर न करता माहिती तंत्रज्ञानाद्वारे पेपरलेस कामावर भर आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 04/Jun/2025